श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “मी काय बोलतंय?” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… “तसो नाय गो चेडवा! … मी तुका इसरन कसा? … अगो नउ महिने पोटात असल्यापासून तुका पोसत इलय… तुका लहानाची मोठी केली… या पारूबाईचा काळजाचो तुकडो असा तू… पन चेडूचा एकदा लगिन केल्यावर सासरी गेला कि तिच्या मायने सारखो सारखो तिच्या संसारात जास्त लुडबुड करा नयै… असा वाडवडील सांगत ईलेत… हा तुला ठाव असाना? … मंगे झाला तर… तू माझी काळजी करा नको हां… तुझो बापूस आनि मी हडे गावात सुखात रवतंय… ते भिकुशेठच्या शेतावर रोज जातंत… दोनचार रूपयाची मजूरी करून तेलं मीठ आणंतत.. मी घरात पडवी बसान ताडगोळे, रांतांबे वाळवान टाकत रव्हता… अंबील आनी नाचणी ची भाकरी खात दिवस मजेत जाता आमचा… आता हया दात पडून गेलेल्या बोळक्याला दुसरा काय चावाक जमना नाय… मिरगाचा पाऊस पडलो कि दारातलो आड भरुन वाहताला… तवसर शेजारच्या शिंदेवाडीतून घागरीने पानी आणूक काय तो तेव्हढा लागता… जरा वाईच लांब असतला ती वाडी.. तूझ्या लग्नाच्या आधी तू पन असाच पानी हय़सर भरत व्हतीस ना… पानी व्हया तर.. त्याबिगर काय जमना नाय… त्रास कसलो त्यात मैलभर चार पावला चालला तर खालेला जिरायचा… नायतर गॅसने पोट फुगान दुखाक लागलो तर डागदर तरी कुठलो जवळ असा… त्याचो दवाखानो थडे तालूक्याला सहा मैलांवर… गाडीघोडा रस्त्यावरून सुसाट धावत असता पन त्यात आमच्या म्हातारी माणसांका जागाच नसता.. मंगे आमका चालतच जाऊचा लागता त्येच्याशिवाय पर्याय खयं असता… तुका सगळा ठाव हाय गे… माझी बाईल ता तू इथून गेलीस तेवा जसा गाव, व्हता तसाच आजपन असा. चांभारचवकशी करनारो नि एक ना कामाचो… या कोकनात हिरवो पालो कधी येता पहिला पिकला पान पडून गेल्यावरचना… सुरेश तुझो भाव दरमहिन्याक आमका मनिआरडर पाठवता शंभर रुपायची… आयशी बापसाचे ऋण फेडत असता शंभर रूपयाची मनिऑर्डर पाठवून… आमच्या वंशाचो दिवा असाना तो… मंगे त्याचो शहरातलो झळळाता उजेड बघान आमचे डोळे दिपून का नाय जायचे… ते मिटतील तेवा मिटतील… हयांच्या तालुक्याच्या हून आणलेल्या औषधाला दिडशे लागतत… मंगे मी नारळ इकतय तेवा कुठे औषध हातात येता नि जेवा हातात येता तेवा त्या औषधांचा गुन कमी पडता नि आजाराची ताकद वाढता… सुरेशचो पन संसार असा गे चेडवा आमका जास्त पैसे पाठवून त्यो बायका पोरांका उपाशी कसा ठेवतलो… ता आमका बरा वाटता काय… गाव बरा पन शहरात रव्हना नको… जीव घायकुतीला येता… असा सुरेश जेव्हा जेव्हा आमका भेटूक येता तेवा इतकाच बोलून जाता… मगं आमी दोघंव बी त्याका सांगतत तुका जमत असा तर आमका मनिऑर्डर पाठव उगा जीवाक नसतो घोर लावानं घेऊ नको… इतको त्याने आमचो शब्द पाळल्यान आता तो आठवणीने ज्ञतीन चार महिन्यानं शंभर रूपयाची मनिऑर्डर पाठवता.. तो दिवस आमचो दसरा दिवाळीच असता… ता जाऊ दे
तू आमची कायेव काळजी करा नको… आमचा दोघांचा बी रव्हला ता किती? … रात्रोव झोपून उद्याची सकाळ दिसली तर आयुष्याचो बोनसच मिळाल्यासारखा वाटता… पन त्याचो आनंद कायेव वाटना नाय? झाडाची पानगळ शिमगो झाल्यापासून सुरू व्हता… रोज ऐकेक गळत जाता… एक दिवस आमचा बी असाच होतला… अन हि कुडी या मातीत मिसळून जातली… तुमचो संसार सुखाचो व्होयो हिच आमची धडपड असा… माका काय गाव सोडून तुझ्या घरी त्या मोठया शहरात येना जमना नाय… मला अडानीला थंयसर काय करमनार? … असोच अधुन मधून फोन करत जा… आनि आईची आठवण इलीच तर माझो मोबाईल रिचार्ज करांन विसरू नको.. तो चालू असा तोवर आम्ही हयसर असतलो.. तो बंद झालो तर आम्ही…
हॅलो.. हॅलो… अरे बंद झालो.. नेहमी असाच होता… मनातला बोलायच्या येळेकच हा मोबाईल बंद पडता… मेलो पुढचा कधिच बोलू देत नाय… शिरा पडली ती त्येच्यावर… “
© श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





