श्री सुधीर करंदीकर

??

☆ “ऊन – पाऊस…” ☆ श्री सुधीर करंदीकर

गेले काही दिवस पुण्यामध्ये छान पाऊस सुरू आहे. मधेच कधी पाऊस थांबतो, छान  ऊन पडतं आणि पुन्हा बारीक पाऊस सुरू होतो. 

आणि बऱ्याच वेळेला पुण्यामधल्याच मित्र-मैत्रिणीशी फोन करताना असं समजतं की त्यांच्या भागात पाऊस सुरू आहे आणि आपल्याकडे ऊन असतं.

काल रविवार होता. सकाळी अगदी बारीक पाऊस सुरू होता. सकाळचा चहा पाणी आटोपलं, आणि बाहेर बघतो तर मस्त ऊन पडलं होतं. विचार केला कर्वेनगर कडे वनदेवी मंदिरापर्यंत मस्त उन्हामध्ये फिरून यावं. चालण्याचा व्यायाम होईल, भरपूर प्राणवायू मिळेल आणि छान डी व्हिटॅमिन पण  मिळेल.

उन्हातून चालताना मस्त फ्रेश वाटत होतं. इकडे तिकडे बघत बघत वनदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे वळलो. आणि बघतो तर वनदेवी मंदिराच्या पलीकडे मुसळधार पाऊस पडत होता, आणि मंदिराचे अलीकडे मी चालत होतो तिथे ऊन होतं. अजून थोडे पुढे गेलो, तर  मंदिराच्या बरोबर समोर एका साईडला जोरदार पाऊस आणि एका साईडला उन. 

मी बरोबर बॉर्डरवर दोन्ही हात बाजूला आडवे करून मंदिरासमोर उभा राहिलो. मंदिराच्या अर्ध्या भागावर पाऊस पडत होता आणि अर्ध्या भागावर चक्क ऊन होतं. आणि मी उभा होतो तिथे माझ्या एका हातावर पाऊस पडत होता आणि ती बाजू पूर्ण ओली झाली होती आणि एका हातावर उन होतं आणि तो भाग पूर्ण कोरडा होता. एक वेगळाच आणि कधी न घेतलेला अनुभव घेताना मजा येत होती.

मला बघून रस्त्यावरचे काही लोक हा आगळावेगळा आनंद घेण्याकरता माझ्या मागेपुढे आडवे हात करून बॉर्डरवर उभे राहिले. काही लोक स्कूटर वरून खाली उतरले आणि उभे राहिले. काहीजण कार  थांबवून खाली उतरले. वारजे साईडचे पण लोक आले आणि उभे राहिले पण ते आधीच पूर्ण ओले झालेले होते. 

हा ऊन पाऊस आनंद घेत सगळेचजण  मोठमोठ्याने हसत होतो आणि आरडाओरडी करत एन्जॉय करत होतो.

उन्हाकडे असलेल्या काही लोकांनी फोटो पण  काढले. 

इव्हिनिंग इन पॅरिस या सिनेमा मधलं गाणं आठवलं –

अजी ऐसा मौका फिर कहा मिलेगा—

पुन्हा असा चान्स मिळाला आणि तुम्हाला बोलावलं तर येणार का ?

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted