श्री दिवाकर बुरसे
✦ हनुमानाची प्रार्थना – तारी उदारा… ✦ श्री दिवाकर बुरसे ☆
(चैत्र पौर्णिमा, गुरुवार २ एप्रिल २०२६ – – या दिवशी संपन्न होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त हनुमानाची प्रार्थना)
☆ तारी उदारा ☆
☆
रघुवीर दासा, रुद्रावतारा
तारी उदारा, तारी उदारा!।।१।।
*
मंदारमाला, सिंदूर ल्याला
मज बालकाला, तारी उदारा।।२।।
*
तुझिया प्रतापे त्र्यैलोक सारा
कापे थरारा, तारी उदारा।।३।।
*
बजरंग धीरा, बळवंत वीरा
भवदुःख हारा, तारी उदारा।।४।।
*
वायू-सुपुत्रा, बुद्धीसमुद्रा
षट्शत्रु वारा, तारी उदारा।।५।।
*
कपिसंघमुख्या, दे शांति सौख्या
शरणागता या, तारी उदारा।।६।।
☆
© श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






