श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ अजातशत्रू… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

कोणत्याही सजिवानं जनलोकात रुजायच, वाढायचं परोपकारी झाड बनायचं अशी खुणगाठ मनाशी बांधली असेल तर त्यान मातीशी आपली फारकत करून कसं चालेल? त्यासाठी त्यांना बीज होऊन मातीवरच पडायचं, मातीतच दडायचं, लपायचं. परिस्थितीच्या‌

बदलत्या हवामानानं योग्यवेळी पाऊस पाडायला हळूहळू दमदार सुरुवात केली की अंकुरायच, मातीतनं काढायचं डोकं वर आणि लुकलुकणा-या डोळ्यान बघायचं जगाकड बाहेरच्या, विशाल विस्तारलेल्या. मग आकाशाकड निरखून बघत ठरवायचं मला आहे तिथपर्यंत पोहोचायचं, तेव्हा कुठं थोडंसं यश पदरी पडू लागतं जगण्याचं. तसं जगणं साधं सोपं सरळ नाही. कारण ते जोडलं गेलंय निसर्गाशी. त्याने घालून दिलेले दंडक तंतोतंत पाळले गेले तुमच्याकडून तरच तुम्हाला आडवायची बिशाद नाही कुणाची. म्हणूनच तुमच्यात मुरलेला तुमचं अवखळ खट्याळपणा तुम्ही कधीच हरवू देवू नका. रोज काहीतरी जगण्याच्या नव्या सोज्वळ खोडी अमलात आणा. आणि जगून दखवा त्याच मार्गानं जगाला. निर्माण करा तुमच्या जगण्याच्या नव्या पाऊल वाटा. हळुवारपणे पण भक्कम पावलं टाकत चालण्यासाठी. मग बघा तुमच्या पदरी काय पडतं ते. पण हे करताना मातीवर तुम्ही रोवलेले तुमचे घट्ट पाय कधीच डळमळीत होऊ देऊ नका. कारण तिथेच तुमच्या पायांना आणि त्यांच्या नव्या चालीना नवे तरतरीत कोंब फुटतील, वाढतील भिडतील आकाशाला. मग त्यांच्यावर विसावतील नव्यान जगायला शिकणारी नवी पाखरं अनुभवी मार्गदर्शनासाठी. हे करताना मतीला माता समजून तिच्याच मांडीवर खेळत रहा. वाढत रहा, तिची करु नका प्रतारणा कधी. येवढ प्रामाणिक पणे केलं तर तुम्ही खरोखरंच जग जिंकाल आणि बनाल धरणीवरचे खरे अजातशत्रू

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted