श्री मोहन निमोणकर
विविधा
☆ “मित्रवर्य स्मित…” – लेखक : श्री सदानंद फडके, एक नूमवीय ☆ श्री मोहन निमोणकर ☆
मित्रवर्य स्मित..
अरे बांधवा,
तुला कळलंय का तू किती मोठा पराक्रम केलास?
या पराक्रमाची तुलना ही भीम पराक्रम अशीच केली पाहिजे.
आज तुझ्यावर पोस्ट लिहावयाचे कारण तू आमच्या संस्थेचा माजी विद्यार्थी आहेस. शिक्षण प्रसारक मंडळीच्या वेलींगकर इन्स्टिट्यूटचा तू माजी विद्यार्थी आहेस. अरे समोर आला असतास तर मिठीच मारली असती आणि पाठीवर शाबासकीची जोरदार थाप मारली असती..
ज्यावेळी दुबईला तू तुझ्या विमान कंपनीच्या समूहासह ज्याला (इंग्रजीमध्ये क्रू असं म्हणतात) असा जेव्हा विमानात प्रवेश केलास, त्यावेळेला टीमचा कप्तान या नात्याने ‘आपण सर्वजण आपल्यावर विसंबून राहिलेल्या या सर्व प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवू ‘ या आत्मविश्वासाने, Flydubai कंपनीच्या विमानात प्रवेश केला होतास. समूहातील सर्वांशी तुझे चांगले संबंध होतेच त्यातून अगदी जवळचा म्हणजे जो को-पायलट म्हटला जातो सहवैमानिक म्हणला जातो तो तर तुझ्या विश्वासातलाच..
दोघांचा समन्वय हा फार महत्त्वाचा कारण तुम्हा दोघांवर या १७४ प्रवाशांच्या जीविताची जबाबदारी होती. त्यांना सुखरूपपणे नेणे हे विमानाचा चालक म्हणून तर काम होतेच पण विमान कंपनीचा एक जबाबदारी जबाबदार अधिकारी म्हणूनही होते. विमान निघाल्यावर हवाई सुंदऱ्या विमान प्रवाशांना आपत्कालीन स्थितीत कसे वागायचे याचे शिक्षणही देऊ लागल्या. तू विमान चालवत होतास कॉकपिटमध्ये गेल्यावर नियमानुसार कॉकपिट चा दरवाजा आतून बंद करण्यात येतो. कारण कोणीही अगंतुक व्यक्तीने तेथे प्रवेश करु नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येते. अगदी दोन विमान चालकांपैकी एकाला लघुशंकेसाठी जायचे असले तरी कॉकपिटच्या दरवाजाच्या बाहेर हवाई सुंदरी विमानात असलेल्या लोखंडी सरकत्या पेट्यां ची एक भिंत उभी करतात..
त्या भिंतीच्या मागे तीन तीन हवाई सुंदरी उभ्या राहतात
आणि मग आतला एक सहवैमानिक लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात जातो. तेथून बाहेर पडल्यानंतर तो कॉकपिट मध्ये जातो कॉकपिटचा दरवाजा बंद करतो आणि मगच त्या हवाई सुंदऱ्या इतर प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाचा मार्ग उपलब्ध करून देतात इतकी कडेकोट व्यवस्था आणि बंदोबस्त हा कॉकपिटच्या सुरक्षिततेसाठी केला असतो..
पण स्मित तुला काय माहिती की ज्याच्यावर मी थोड्या वेळाने विमानाचा भार थोड्या कालावधी करता का विना सोपवणार आहे त्याला कुठल्यातरी योजनेनुसार काही कृती या लवकर करायच्या आहेत त्या करण्यासाठी तो, विमान चालवण्यामध्ये एकाग्र झालेल्या तुझ्यावर पटकन धारदार शस्त्राने हल्ला करेल?
पण त्याने हल्ला तर केलाच शिवाय विमानाचा प्रवास धोकादायक होण्यासाठी तू हडबडून जाण्यासाठी अशी काही कृती केली की ज्यामुळे ते विमान सुसाट वेगाने जमिनीच्या दिशेने खाली येऊ लागले काही मिनिटातच किंवा क्षणातच हजारो फूट ते खाली आले दुसऱ्या बाजूने तू विमान सावरण्याचा प्रयत्न करत होतास आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत होता पण विश्वासघातकी सहका ऱ्याचे सपासप वारही चालू होते..
त्याही कालावधीत तू प्रसंगावधान राखून एक बटन असे दाबलेस की ज्यामुळे कॉकपिटचा दरवाजा उघडला गेला.
बाहेरच्या बाजूला असलेल्या सर्वांना तोपर्यंत कल्पना आली होती की कॉकपिट मध्ये काहीतरी गडबड आहे पण ती गडबड आहे का विमानातला बिघाड आहे हे समजत नव्हते. कॉकपिटचा दरवाजा उघडल्यावर मात्र व्यवसायाने प्लंबर असलेला ” यानीव हायुन” हा तुझ्या मदतीस आला..
त्याने पटकन काय केले तर त्या हल्लेखोर सहवैमानिकाला पटकन ताब्यात घेतले आणि कॉकपिटच्या बाहेर ढकलून दिले बाहेरच्या व्यक्तींनी तत्काळ त्याच्यावर झडप घातली आणि त्याला जेरबंद केले विशेषतः असाफ राजूआन आणि झिक्वा मेन्स यांनी प्रवाशांकडून मोबाईलच्या चार्जिंग केबलने आणि हेडफोनच्या वायरने त्याचे हातपाय बांधले असाफ राजवान हे एक व्यावसायिक आहेत आणि झिवा मेन्स हे बँकेचे कार्यकारी अधिकारी आहेत..
तोपर्यंत तू रक्तबंबाळ अवस्थेत झुंजतच होतास नंतर ज्यावेळी विमान प्रवाशांपैकी दोघजण हे तुझ्याच विमान कंपनीचे वैमानिक होते ते तुझ्यापाशी आल्यानंतर त्यांच्या ताब्यात विमान देऊन तू कॉकपिटच्या बाहेर आलास..
तुला हे माहित्ये का, की त्या सहवैमानिकाचे नाव अद्याप पावेतो जाहीर केलेले नाही केवळ तो ओमान या शांतता प्रिय देशातला आहे एवढेच सांगितले आहे. कारण खरे नाव कळले तर आपोआप आणखीन काही गोष्टी बाहेर येणार आहेत..
तुला हे माहित्ये आहे का, की इजराइलनेही दोन नवीन सहवैमानिक विमान चालवायला बसल्यावर तुझ्या विमान कंपनीला विनंती केली होती की वेळापत्रकानुसा ते विमान इजराइललाच येऊ द्यात पण कंपनीने ती विनंती नाकारली आणि विमान सौदी अरेबियाला उतरवले..
तुला त्याचे कारण माहिती आहे का, कारण आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हवेमध्ये उडणाऱ्या विमानामध्ये एखादा गुन्हा घडला तर ते विमान ज्या कंपनीच्या मालकीचे आहे ती कंपनी ज्या देशांमध्ये नोंदणीकृत असेल त्या देशाचा कायदा अंमल करतो व त्या देशातील कायद्यानुसार त्याचे वर गुन्हा दाखल करण्यात येतो किंवा ज्या देशांमध्ये ते विमान उतरवले गेले आहे त्या देशाच्या कायद्यानुसार अपराधी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येतो..
तुला हे माहित्ये का, शांतताप्रिय देशाचा ओमान सहवैमानिक गुन्हा करतो त्यामुळे त्याला शांतता प्रिय देशांमध्येच गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे नाटक वठवण्यात येईल. तुला माहितीये का आता अनेक खोट्या कपोल कल्पित गोष्टी रचल्या जातील त्यामध्ये तुझे ओमानी सहवैमानिकाशी वैयक्तिक कारणावरून भांडण झाले असेही दाखवण्यात येईल..
पण या सर्व प्रश्नांची तुला त्यावेळी माहिती असण्याचे कारणच नव्हते कदाचित या प्रश्नांची उत्तरे पुढील अनेक महिने मिळणार नाहीत. कारण अनेक शांतता प्रिय देश तुझ्या पराक्रमामुळे नुसते चकीतच झाले नाहीत तर स्तंभित झाले आहेत..
अरे मित्रा, तू जर कॉकपिटचा दरवाजा उघडला नसतास तर काय झाले असते कल्पनाही करवत नाही. सरळ सरळ जमिनीच्या दिशेने गुरुत्वाकर्षणामुळे त्यामध्ये भर विमानाच्या वेगामुळे एक तर संपूर्ण विमान जमिनीच्या पृष्ठभागावर आदळले असते आणि तुझ्यासह सर्व समूहाचा आणि प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला असता..
सर्वजण जळून खाक झाले असते काही शिल्लक राहिले नसते आणि मग नंतर जाहीर झाले असते एका हिंदुस्थानी विमान चालकाने नियोजनपूर्वक १७४ इजरायली नागरिकांचा बळी घेतला आणि हे सर्व बालंट भारतावर आले असते जेणेकरून
“हिंदुस्तानचा जागतिक भगवा आतंकवाद ” असा खोटा प्रचार करण्यात आला असता. हिंदुस्थानवर आणि भारत मातेवर नामुष्कीची वेळ आली असती. माथी एक कलंक लागला असता. जागतिक राजकारणाची जिओ पोलिटिकल सर्व समीकरणे बदलली असती. मित्र राष्ट्रे ही शत्रू राष्ट्रे झाली असती आणि खऱ्या शत्रू राष्ट्रांना अत्यानंद झाला असता..
आणि जर तसे झाले नसते तर ज्या क्रूरवर्म्याने विश्वासघातकी सहचालकाने तुझ्यावर हल्ला केला त्यानेच विमानाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घेतले असते आणि ठरलेल्या योजनेनुसार कुठल्यातरी शांततावादी देशांमध्ये प्रवेश करून ते विमान त्याने हायजॅक केले आहे त्या विमानाचे त्याने अपहरण केले आहे असे जाहीर केले असते आणि त्या १७४ ज्यू नागरिकांच्या मोबदल्यामध्ये अतिरेक्यांच्या मागण्या समोर ठेवल्या असत्या..
पण स्मित तुझ्या प्रसंगावधानामुळे त्या शांततावादी अतिरेक्यांच्या षडयंत्राला तू तिलांजली दिलीस. त्यांचे सर्व अंदाज पोकळ ठरवलेस. त्यांच्या योजनांना सुरुंग लावलास.
स्मित तुझ्या प्रसंगावधानाला, तुझ्या शौर्यतेला, तुझ्या साहसाला त्रिवार मुजरा वैयक्तिक म्हणून तर करतोच आहे, परंतु शिक्षण प्रसारक मंडळीच्या छत्राखाली असलेल्या वेलींगकर इन्स्टिट्यूट, पोद्दार कॉलेज, रुईया कॉलेज, याशिवाय पुण्यातील स. प. महाविद्यालय, प्रा नारळकर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, सोलापूरमधील हरीभाई देवकरण प्रशाला, तसेच प्रा. मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, पुण्यातील नू. म. वि. नावाने सुप्रसिद्ध असलेल्या सर्व शाळा, बी. एड. कॉलेजच्या सर्व आजी व माजी गुरुजनांचे सेवकांचे आणि विद्यार्थ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करीत आहे. कारण आम्हा सर्वांची छाती अभिमानामुळे आज फुगून आली ती केवळ तुझ्यामुळेच..
स्मित तुझे नाव आल्यानंतर नावामुळे व आडनावामुळे हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे याचा शोध लगेच सुरू झालाच काही जणांनी तुझ्या मच्चर या आडनावाच्या स्पेलिंग वरून उच्चार मच्छर असा केला. पण तू आज गरुडाचा पराक्रम दाखवला आहेस तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे..
तुझ्या वडिलांचे नाव उपेंद्र आहे पण उपेंद्रच्या पोटी जन्म घेतलेल्या स्मितने आज इंद्रासारखा पराक्रम गाजवला आहे.
भारतासाठी तू खरोखरच एक अनमोल रत्न आहेस परत एकदा तुझे त्रिवार अभिनंदन। शुभेच्छा. तुझ्यामुळे आपल्या संस्थेची मान उंचावली आहे हे सांगण्यास आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद,
जय हिंद !
लेखक : श्री सदानंद फडके
प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




