सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री राजीव पुजारी

💐 अ भि नं द न 💐

अधिकतर विज्ञान-विषयक माहितीपूर्ण लेख लिहिणारे आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखक श्री राजीव पुजारी यांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी “ आशीर्वाद पुरस्कार “ जाहीर…

गेली २७ वर्षे सातत्याने वंदना प्रकाशन, मुंबई ह्या संस्थेतर्फे उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या ‘आशीर्वाद पुरस्कार’ ह्या मानाच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली.

या पुरस्कारासाठी सांगलीचे श्री राजीव पुजारी यांच्या ‘अंतराळवेध’ या पुस्तकाची संकीर्ण या विभागात निवड झालेली आहे.

हे पुस्तक अहमदाबादच्या क्राउन प्रकाशनने प्रकाशित केले होते. ह्या मानाच्या पुरस्कारासाठी देश विदेशातून एकूण ३४८ पुस्तके आलेली होती हे आवर्जून सांगायलाच हवे.

या पुस्तकाविषयी – – 

हे पुस्तक अवकाश विज्ञानाला वाहिलेले आहे. या पुस्तकात नासा व इस्रो द्वारा आयोजित विविध अंतराळ मोहिमांचा समावेश आहे. १० लेखांचा समावेश असलेला एक विशेष विभाग नासाच्या मंगळ २०२० मोहिमेला समर्पित आहे. याशिवाय LCRD, IXPE, DART, LUCY जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण, आर्टिमिस योजना, चांद्रयान-३, गुरुत्वीय लहरी, आदित्य L1, नासाची मंगळ ग्रहावरील मातीचे नमुने परत आणण्याची मोहीम इत्यादी मोहिमांवर अभ्यासपूर्ण लेख आहेत. यासोबतच दोन रंजक अंतराळ कथा आहेत. शेवटचा विभाग संशोधक व संशोधन संस्था यांसंबंधी आहे. यामध्ये डॉ विक्रम साराभाई, प्रो यू आर राव, के कस्तुरीरंगन, एम जी के मेनन, डॉ सतीश धवन यांचेविषयी माहिती आहे. तसेच इस्रो व त्याच्या विविध केंद्रांची माहिती आहे. एकंदरीतच हे पुस्तक वाचनाचा आनंद देणारे आहे.

… इतका मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. राजीव पुजारी यांचे सर्व थरांतून कौतुक होत आहे.

आपल्या सर्वांतर्फे श्री. राजीव पुजारी यांचे त्रिवार अभिनंदन. आणि यापुढेही असेच माहितीपूर्ण आणि उत्कृष्ट लिखाण असणारे साहित्य त्यांच्याकडून लिहिले जावे आणि असेच अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळत रहावेत यासाठी मनःपूर्वक अगणित शुभेच्छा.

 संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted