सूचना/Information
🙏🏻💐 स्व. मारुती चित्तमपल्ली 💐🙏🏻
🙏🏻 श्रद्धांजली अरण्याची 🙏🏻
☆
अरण्यातील ऋषी तपस्वी आज शांत जाहले
सारे जंगल आज सकाळी पोरके हो वाटले
*
स्तब्ध झाल्या कोकिळा अन निःशब्द झाले खगगण
सुने सुने आज जाहले जंगलाचे आंगण
*
माळावरच्या कोळणीने दार आतून बंद केले
कीटकांनी पंख आपले आज मिटवून घेतले
*
जंगल वृक्ष ते स्तब्ध झाले सळसळ त्यांची थांबली
खारुताईची ती पळापळ ती ही आज मंदावली
*
हिरवी पाने कुजबुजुली सांगती काहीतरी
वारा म्हणतो या बसा माझ्या या पंखावरील
*
वाहूया पाने फुले ती त्या ऋषीच्या चरणावरी
निष्प्राण देह ,तरी कळेल त्यांना कृतज्ञता आपली खरी
*
🙏💐भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



