सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सुश्री सुरेखा चिखलकर

💐 अ भि नं द न ! अ भि नं द न !! त्रिवार अभिनंदन!!!💐

आपल्या समूहातील लेखिका / कवयित्री सुश्री सुरेखा चिखलकर यांना नाशिक येथील ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघा’च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘दामिनी राष्ट्रीय पुरस्कार‘ प्रदान करण्यात आलेला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो. सुरेखाताईंना त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. दोन्ही पायांनी 80% दिव्यांग असलेल्या सुरेखाताई सातत्याने करत असलेल्या या कार्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक वाटते. 

तसेच – – 

१) सामाजिक कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार, आणि

२) प्रतिष्ठा फाउंडेशन कडून त्यांच्या अंकुरित आभाळ या काव्यसंग्रहास ‘ग्रंथरत्न पुरस्कार‘– – असे आणखी दोन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.

आपल्या समूहातर्फे सुरेखाताईंचे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या यापुढील अशाच यशस्वी वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.

शनिवार दि. ७/३/२६ रोजी ‘ पुस्तकावर बोलू काही ‘ या सदरात त्यांच्या “अंकुरित आभाळ“ या पुरस्कारप्राप्त काव्यसंग्रहाचा परिचय आपण करून घेतलेलाच आहे.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments