हेमन्त बावनकर
ई-अभिव्यक्ति – संपादकीय… एक संवाद… ☆ हेमन्त बावनकर
ई-अभिव्यक्तीच्या सर्व साहित्यिकांना आणि वाचकांना सप्रेम नमस्कार. आज आपल्या सर्वांशी एक खास संवाद…
ई-अभिव्यक्ति या आपल्या वेबसाईटला यंदा ८ वर्षं पूर्ण झाली आहेत, आणि आज… दि. १५ ऑगस्ट ‘२६ रोजी ई-अभिव्यक्ती ‘मराठी’ विभागाला ६ वर्षं पूर्ण होत आहेत हे सांगतांना मला अतिशय आनंद होतो आहे.
आजपर्यंत या मंचावरून ३५,८०० पेक्षाही जास्त साहित्यकृती प्रकाशित झालेल्या आहेत आणि – – https://www .e-abhivyakti.com या आपल्या वेबसाईटला ![]()
![]()
![]()
![]()
![]()
पेक्षाही जास्त वाचकांनी भेट दिलेली आहे… आणि छान प्रतिसादही दिलेला आहे.
… या आपल्या मंचाबद्दलची एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे “ई-अभिव्यक्ती” हे भारतातलं असं पहिलंच प्रकाशन आहे, जे गेल्या चार वर्षांपासून “ फ्लिपबुक “ या स्वरुपातला हिन्दी आणि मराठी दिवाळी विशेषांक ‘नि:शुल्क’ प्रकाशित करत आहे.
आपल्या तिन्ही भाषांमधील दैनिक अंकांसाठीचे संपादक मंडळ आपल्यासारख्या प्रगल्भ साहित्यिकांच्या आणि रसिक वाचकांच्या सहकार्याने या साहित्य-सेवेसाठी सातत्याने आणि पूर्णपणे नि:स्वार्थ भावनेने काम करत आलेले आहे, आणि साहित्यक्षेत्राला एक नवे ‘परिमाण‘ देण्याचा प्रयत्न करत आहे. या संदर्भात मी आवर्जून सांगू इच्छितो की, आपल्या संपादक मंडळातले सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सगळेच स्वतःही साहित्यिक आहेत. आणि या कामात त्यांना कुठलाही व्यावसायिक लाभ नसतांनाही “स्वांतसुखाय“
म्हणतात तसे अविरत काम करत आहेत – – लेखकांना एक उत्तम मंच आणि वाचकांना उत्कृष्ट साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहेत…नवोदित साहित्यिक, तसेच ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्यासाठी ई-अभिव्यक्ती हा एक सन्मान्य मंच सदैव उपलब्ध आहे.
– – बंधन फक्त एवढेच की राजकारण… जातीवाद… सामाजिकदृष्ट्या… आणि धार्मिकदृष्ट्या… कुठल्याही प्रकारे विवाद्य ठरू शकेल असे लेखन या मंचावरून प्रकाशित केले जाणार नाही – आणि साहित्य पाठवतांना कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी.
सर्वांना सस्नेह विनंती आहे की या मंचावरून दैनिक स्वरूपात प्रकाशित केल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण साहित्याचा आपण सर्वांनी तर आस्वाद घ्यावाच, आणि आपल्या मित्रपरिवाराला… परिचितांनाही सोशल मीडियावरील या दैनिकाचा आनंद घेण्यास उद्युक्त करावे.
आपल्या सूचना आणि विचार यांचे नेहेमीच स्वागत आहे.
… पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
आपला,
हेमन्त बावनकर ✍️🙏
≈≈
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈
