श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ भुरूभुरू पावसात फिरतांना… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
या भुरुभुरु पावसातून फिरताना
किती आल्हाददायक वाटतंय.
*
ही ओली वाट दुतर्फा हिरवाळीच्या गालिच्यासारखी….
रस्त्यावरची छोटी छोटी तळी..
अन् त्यात डुंबणारी पाखरं…
तान्हुल्याच्या जावळासारखी झुलणारी शेते….
फांद्या फांद्यावर गाणारा पाखरांचा थवा…
कोवळ्या उन्हात चमचमणारे दवबिंदूंचे मोती…
फुलांचा अन् ओल्या मातीचा दरवळ…
ओठांवर येऊन थांबलेले निळे गाणे…
वाटतं
संपूच नये ही वाट अन् चालणं ही.
*
या भुरुभुरु पावसातून फिरताना
किती आल्हाददायक वाटतंय,
भर उन्हातून ‘तिच्या’ सोबत
जात असल्यासारखं…
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवी / गझलकार
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




