सुश्री संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ तिळगुळ समारंभ… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆
आमच्या बिल्डिंगचा तिळगुळ समारंभ छान झाला. या आठवड्यात संक्रांतीचे हळदीकुंकू म्हणून बऱ्याच जागी बोलविले होते. काळया रंगाच्या साड्यांना अगदी बहर आला होता. काळया रंगाची पैठणी पासून ते विविध प्रकारच्या साड्या बघायला मिळाल्या. ••••
काही जणींचा ड्रेसिंग सेन्स खूप छान असतो. प्रसंगानुरूप परिधान, त्यावर मॅचिंग इतर Accessories घालून त्या छान तयार होतात. व स्वतः ला छान carry करतात. अशा स्टायलिश बायका नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. याकरिता आवड पाहिजे, ती समज पाहिजे, हौस तर असायलाच पाहिजे. व सर्व व्यवस्थित करताही आले पाहिजे. •••••
मला अशा बायका खूप आवडतात. आपला स्त्री म्हणून ‘सजण्याचा ‘ जन्मसिद्ध अधिकार त्या व्यवस्थित उपयोगात आणतात. स्त्री जन्माचा आनंद भरपूर उपभोगतात. मला नेहमीच कौतुक वाटतं त्यांचे. ••••
आज अनिता कडे हळदीकुंकू आहे. आमच्या बिल्डिंगच्या सर्वच मैत्रिणीना आमंत्रण आहे. रेहाना व तिच्या सासूबाई. पल्लवी आपल्या सासूबाईं बरोबर, जोशी काकू, कुलकर्णी काकू आल्या. तसेच अजून अशाही बर्याच बायका होत्या ज्या आपल्या आयुष्याच्या प्रवासात आता एकट्याच आहेत. त्यांचे जोडीदार त्यांना सोडून गेले आहेत. प्रकृतीचा नियमच आहे तो. मानावाच लागतो. कोणी आधी कोणी नंतर साथ सोडणार हे आधीच ठरलेलं असते. •••प्रकृतीच्या नियमाप्रमाणे वागावेच लागते. पण याचा अर्थ आयुष्याचा आनंद कमी करणे नव्हे. नेहमी आनंदी राहण हा प्रत्येक स्त्री पुरुषाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. ••••
म्हणतात ना ••••
“जीवन तब कठिन लगता है, जब हम स्वयं को बदलने की बजाय परिस्थितियों को बदलने का प्रयास करते हैं।”•••
अनिता तशी अगदी साधी मुलगी. फॅशन, स्टाईल तिच्या आसपासही फटकत नाही. पण विचारांनी खूप श्रीमंत व आधुनिक. नेहमी काही तरी वेगळा विचार करणार. •••••
आज हळदीकुंकवाला तिने सर्वांना आग्रहाने बोलविले होते. रेहाना, पल्लवी च्या सासूबाई म्हणाल्या पण ••••अग आम्ही येऊ पुन्हा कधी. आज तुम्ही सर्व मुली enjoy करा. आज हळदीकुंकवाच्या निमित्ताने तुम्ही सर्व किती तरी दिवसांत भेटणार अहात तेंव्हा मजा करा. पण अनिता कुठे ऐकते कोणाचे?? तीने सर्वांना संध्याकाळी चार वाजता यायचा आग्रह केला. ••••
सर्व जण पाच दहा मिनिटांच्या अंतरावर पोचल्याच. आज अनिता च्या मुलाचे ‘बोरन्हाण ‘ चा कार्यक्रम ही आहे. अनिता ने रेहाना च्या सासूबाई, आम्ही सर्व त्यांना ‘अम्मी’ म्हणतो. त्यांना मदतीला घेतले. सर्व ‘आजी पार्टी ‘ ला मागे अर्ध गोलाकार पद्धतिने बसविले व त्यांच्या समोर अनयचा ‘बोरन्हाण’ कार्यक्रम केला. मुलांनी मनसोक्त लूटालूट केली. •••••
माझ्या मुलाला सर्व आजींचे खूप खूप आशिर्वाद मिळु दे असं म्हणाली अनिता. ••
अनिताचे विचार म्हणजे सकारात्मक शक्ति. सर्वांना एकत्र घेऊन कसे पूढे जायचे??? हे ती उदाहरणासह प्रस्तुत करते. ते ही एकदम confidently, सहजतेने. तिच्या विचारांनी दुसऱ्यांना वेगळा विचार करण्याची प्रेरणा मिळते. सुरवात नेहमी स्वतः पासून करायची हेही ती दाखवून देते. एकत्र असणं हा एक सामुहिक आनंद आहे. तो घेता व देता आला पाहिजे. ••••
“खुशी देना ही खुशी पाने का अधिकार है”।”
“आनंद हा संसर्गजन्य रोग, जेवढा जास्त पसरविता येईल तेवढा पसरविता आला पाहिजे. ” थोड्या ‘हटके चालीरीती’ सहज सुरू करता आल्या पाहिजेत. ••••
गृप मधील आधुनिक परिधानात आलेल्या बायका कडून ही खूप शिकता येते. नवीन फॅशनस कळतात. ती एक कलाच आहे सर्वांना नाही जमत. पण त्यांना बघून शिकता नक्की येते. आधुनिक विचार ही कळतात. सध्या कोणत्या फॅशनस ‘IN ‘आहेत तेही कळत. •••••
एकंदरीत हळदीकुंकू म्हणजे जूनी संस्कृती, संस्कार आहेतच. बरोबर एकत्र येणे, भेटणे, गप्पा मारणे, आपल्या दोस्ती ला मजबूत करणे, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणे, म्हणजे गम्मत जम्मतच. काही तरी नवीन शिकणे पण होते. अनिता सारखा वेगळा विचार करता आला पाहिजे. व तो कृतितही उतरवता आला पाहिजे. प्रसंगानुसार आपला विचार अमलात आणता आला पाहिजे. तो सहजपणे प्रस्तुत करता आला पाहिजे. जास्त काही न बोलता सर्वांसमोर आदर्श ठेवता आला पाहिजे. ••••
काही गोष्टीं / विचार बदलणे गरजेचे आहे. फक्त बोलून आपले विचार सांगणारे खूप लोक असतात. पण एक पाऊल पूढे येऊन ते कृतित उतरविण्यारे कमी असतात. सकारात्मक बदल करणे म्हणजेच प्रगती करणे होय. ••••
हळदीकुंकू छान झाले. जोशी आजींनी संक्रांतीचे महत्त्व सांगितले. त्याबद्दल माहिती दिली. नंतर अत्तर, गुलाबपाणी, चाफ्याचे फूलं, तिळगुळ, बोर शेंगा असलेली ओटी, व वाण म्हणून तुळशी रोप. अगदी आनंदाने विचारांनी समृद्ध होऊनच मी घरी परतले.
अशा प्रकारे तिळगुळ समारंभ छान संपन्न झाला. •••••
लक्षात आले, •••
“वाणी और विचार ये दोनों प्रोडक्ट हमारी खुद की कंपनी के होते हैं।
जितनी क्वालिटी और गुणवत्ता अच्छी रखेंगे उतनी ही उनकी कीमत ज्यादा बढेगी । “
” We always work for better tomorrow. Let’s work for better today “.
© सुश्री संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





