सुश्री अपर्णा परांजपे

🌳 विविधा 🌳

☆ ✍️ अभावातून प्रभावाकडे… ☆ सुश्री अपर्णा परांजपे

✍️प्रारब्ध व नशिब!

प्रारब्धात कर्म व स्वीकार असेल तर ते नशिब आहे असं म्हंटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

नशीब स्वीकारण्यासाठी सुद्धा धैर्य व आत्मविश्वास लागतो यात २ भाग स्पष्ट आहेत.

पहिला अनुकूल व सकारात्मक परिस्थिती असेल तर नशीब हा भाग लक्षात येत नाही

नकारात्मक परिस्थिती असेल तर नशीबालाच दोष दिला जातो

दोन्ही ठिकाणी नशिबाचा भाग असतोच पण तो अहं त्या आवरणाखाली असतो.

पण जर जीवनाकडे तटस्थपणे पहाता आले तर सकारात्मक व नकारात्मक दोन्ही ही परिस्थिती एकाच जीवनाचा अविभाज्य घटक आहेत हे जाणवतं व संपूर्ण जीवन मात्र वेगळंच आहे हे लक्षात येतं. या क्षणी नशिब किंवा स्वकर्तव्य काय यावर विचारमंथन घडतं.

असे विचारमंथन घडले तर बाहेर पडणारे नकारात्मक विचार म्हणजेच मर्यादित अहं ची जाणीवच असतात‌ व अमृत म्हणजे विस्तारित स्वयंची अनुभूती असते.

प्रारब्धातूनच आपल्याला ही जाणीव होऊ शकते हे लक्षात यायला हवं. प्रारब्ध आपल्या जीवनाचा नकाशा असतो प्रत्येक गोष्ट आपल्याच कर्माचे फळ असते म्हणून च वैयक्तिक अनुभव येतात हे सत्य स्वीकारले तरच तटस्थ भूमिकेतून स्वतः च्या आयुष्याचा अभ्यास करता येईल. म्हणून मिळालेले हे आयुष्य ही सुसंधी आहे हे समजायला जी बुद्धी लागते त्यासाठी विवेक आवश्यक आहे. दुसरे कुणीही यात बदल करु शकत नाही हे ही त्रिकालाबाधित सत्य आहे.

शिक्षक पूर्ण वर्गाला शिकवतात पण मोजकेच विद्यार्थी याचा खरा फायदा घेतात त्याप्रमाणे सद्गुरू आत्मकल्याणाचा मार्ग दाखवतात त्यांची महावाक्ये समजून घेणे हे सद्षिष्याचे लक्षण आहे. सनातन धर्मात गुरु शिष्य जोडीला म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सूर्यप्रकाश सर्वत्र असतो पण जो खिडकी बंद करेल त्याला तो प्रकाश अनुभवता येणार नाही व ज्याने खिडकी उघडली, त्याच्या घरातील अंधार राहूच शकणार नाही

तसेच प्रारब्धाचा आनंदाने व साक्षीभावाने स्वीकार करणे म्हणजे आपले नशीब आपण ठरवणे आहे , हा विवेक सद्गूरु व सद्संगाशिवाय शक्य नाही म्हणूनच

महाजनो येन गत स पंथ: ……..

आपले प्रारब्ध हे आपले नशिब ठरवण्याची शिडी आहे हे मात्र निश्चित!

मग आपण नशिबवान ठरायचे की करंटे हा आपलाच निर्णय नाही का?

कृतज्ञ मी कृतार्थ मी 🙏

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments