श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
😅सा ब ण !🤣🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆
(वेगळ्याच विषयावर कविता करण्याचा प्रयत्न !🙏)
☆
मी आकर्षक वेष्टनात
कायम बंदिस्त असतो,
ते होता मजवरून दूर
मी परिमळ पसरवितो !
*
मला कोणी तयार करती
वापरून आयुर्वेदाचे शास्त्र,
पण खप वाढवण्या माझा
उत्तम जाहिरात हेच अस्त्र !
*
जाहिरात करती माझी
चित्रपट तारे अन् तारका,
पण स्वतः वापरती कां
मनी मज शंका बरं का !
*
सुगंध कृत्रिम नानाविध
असती माझीया अंगाला,
निवडा तुम्ही कोणताही
जो वाटे तुम्हा चांगला !
*
मळ काढण्या शरीराचा
करती माझा प्रसार प्रचार,
दूर करण्या तुम्ही मनाचा
करा कायम सुविचार !
करा कायम सुविचार !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610
मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





