श्री आशिष बिवलकर
चित्रकाव्य
इंद्रायणी
श्री आशिष बिवलकर ☆
☆
देवाची आळंदी | श्रेष्ठ माऊलींची |
श्रद्धा वैष्णवांची | भक्तीभावे ||१||
*
संत ज्ञानेश्वर | घेतली समाधी |
कृती नाही साधी | तत्कालीन ||२||
*
समाधी स्थानाचे | झाले तीर्थ क्षेत्र |
नगर पवित्र | वैष्णवांचे ||३||
*
सरिता निर्मळ | होती इंद्रायणी |
अमृताचे पाणी | गोडी ऐसी ||४||
*
आजच्या मितीस | समाधी कुशीत |
सरिता दूषित | दिन दुःखी ||५||
*
उदासीन सारी | शासन व्यवस्था |
टेंडरची आस्था | इंद्रायणी ||६||
*
भोळा वारकरी | देखे इंद्रायणी |
वाली नाही कोणी | स्वच्छतेचा ||७||
©️ वास्तवरंग
☆
(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर)
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





