श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस☆ श्री अनिल वामोरकर ☆

बुडावा गर्व

जावोत वाहून

मतभेद आणि इर्षा

या पावसाळ्यात…

 

भिजू दे

तन मन

सद्गुरुंच्या कृपेत

या पावसाळ्यात…

 

रागाचा पर्वत

ठिसूळ होवून

नष्ट होवू दे

या पावसाळ्यात…

 

रिमझिम रिमझिम

बरसू दे सदगुरु कृपा

जे बीज भक्तीचे पेरले, वटवृक्ष होवू दे

या पावसाळ्यात…

 

साधनेचा येवू दे

महापूर असा की

राग द्वेष आणि रिपूं

नामशेष होवू दे

या पावसाळ्यात..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted