सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सुश्री शांभवी जोशी
💐 अ भि नं द न 💐
वंदना प्रकाशन, मुंबई यांच्यातर्फे उत्कृष्ट मराठी वाङमय-निर्मितीसाठी मानाचा समजला जाणारा “आशीर्वाद पुरस्कार” दरवर्षी विविध प्रकारातील साहित्याला दिला जातो. या पुरस्काराचे हे २७वे वर्ष आहे.
या वर्षीच्या पुरस्कारांपैकी ‘कथासंग्रह’ या विभागातील पुरस्कार आपल्या समूहातील लेखिका सुश्री शांभवी जोशी यांना दिला जाणार आहे. या त्यांच्या संग्रहाचे नाव आहे..
“लाइफस्टाईल“. हा संग्रह मधुश्री प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केला आहे.
हा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे शांभवीताईंचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि यापुढच्या अशाच यशस्वी साहित्यिक वाटचालीसाठी असंख्य हार्दिक शुभेच्छा.
आजच्या अंकातील जीवनरंग सदरात वाचूया याच त्यांच्या संग्रहातली एक छान कथा.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






