श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🥰🤳 रॉंग नंबर! 💃🥳 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

बसले होते दुपारी निवांत

पेपर सकाळचा वाचत,

वाजता मोबाईल अवचित

वाचन तंद्री भंगली क्षणात!

 *

मी बोलण्याआधी काही,

झाला समोरचा बोलता,

घाबऱ्या आवाजावरून

“कुणा नवऱ्याचा” वाटत होता!

 *

“सॉरी, तू म्हणशील तसं

या पुढे मी आता वागणार,

अंघोळ झाल्यावर लगेच

टॉवेल सुखायला टाकणार!

 *

रविवार सकाळचे जेवण

मी आपल्यासाठी बनवणार,

रोज जेवण झाल्यावर

माझं ताट मी स्वतः धुणार!

 *

दर रविवारी संध्याकाळी

मोगऱ्याचा गजरा घेणार,

प्रशांतकडची भेळपुरी

मी तुला हाताने भरवणार! “

 *

ऐकून “नवख्या” नवऱ्याचे बोल

मनोमनी फार सुखावले,

नकळत ‘आमचे दिवस‘ आठवून

आठवणीत रमून गेले!

आठवणीत रमून गेले!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted