☆ कवितेचा उत्सव : झरझर पाऊस धार ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆
गच्च नभातुन झरते मुरते
झरझर पाऊस धार
हिरवा हा निसर्ग वाटे
ओल्या मातीचा हुंकार
धरतीचा हुंकार भासतो
स्रुजनाचा ओंकार
चराचराच्या कल्याणाचा
वसुंधरेला भार
© सुश्री नीलांबरी शिर्के
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
निलांबरी छान कविता.
सुस्वागतम् आणि अभिनंदन.
मोजक्या शब्दात सुरेख वर्णन.