डॉ. वसुधा गाडगीळ
☆ जीवनरंग ☆ सामाजिक दूरी (अंतर) ☆ डॉ. वसुधा गाडगीळ ☆
” वर्तमानपत्रातही आले आहे , आता सामाजिक रीत्या सर्वांना एकमेकांपासून दूर राहावेच लागणार आहे. कुठेही येणे नको जाणे नको ! आम्हाला सर्वांना घरात कोंडूनच राहावे लागणार. समजलात का ! कसली नातीगोती आणि कसलेकाय ! ” दिलीपने अख्या कुटुंबाला ही बातमी वाचवून दाखवली आणि तणावाने म्हणाला
” केवढा कठीण काळ आला आहे ! ”
” अगदी सोपे आहे दिलीप ! तुम्ही सगळेजण एकमेकांबरोबर बसून जेवणखाण करता ना….. मी तर कित्येक वर्षांपासून बाजूच्या पड़वीत एकटा… ”
वडिलांच्या तोंडून सामाजिक दूरीचे उदाहरण ऐकून दिलीप अचंबितच झाला !
© डॉ. वसुधा गाडगीळ
संपर्क – डॉ. वसुधा गाडगिल , वैभव अपार्टमेंट जी – १ , उत्कर्ष बगीचे के पास , ६९ , लोकमान्य नगर , इंदौर – ४५२००९. मध्य प्रदेश.
मोबाईल – 9406852480
– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूप छान कथा.
साध्या शब्दात केलेली कान उघाडणी आवडली.