सुश्री मीनाक्षी भालेराव
चार मराठी कविताएँ
(सुश्री मीनाक्षी भालेराव जी की भारतीय परिवेश में स्त्री की पहचान उजागर करती हृदयस्पर्शी कविताएँ।)
१)
आई म्हणायची ,
आपल्या मुलींवर कधी हात टाकू नये.
लक्ष्मी रुसते.
आज सगळीकडे
दारिद्य्र वाढतंय,
महागाई वाढतेय,
कारण
आज देशात ठिकठिकाणी
मुलींना मारले जातंय .
२)
शेजाऱ्यांच्या घरात भिंत उभी राहिली आहे आताशा .
असे वाटतंय , त्यांची मुले कमवू लागली आहेत आताशा .
ज्या आईवडिलांनी हौसेने बांधलं होते घर
ते वृध्दआश्रम गले आहेत आताशा .
शेजाऱ्यांच्या घरात भिंत उभी राहिली आहे आताशा .
असे वाटतंय , त्यांची मुले कमवू लागली आहेत आताशा .
३)
लहानपणी आईपासून
नाईलाजाने दूर राहावे लागले होते ,
तेव्हा आई मला नेहमी
पत्र पाठवत असे.
आज खूप वर्षे झाली
आई जाऊन.
तेव्हापासून तिची ती पत्रेच
बनली आहेत आई !
४)
पूर्वी कच्चे असायचे राखीचे धागे
पण नाती असायची पक्की.
आज अगदी मजबूत असतात राखीचे धागे
पण नाती मात्र बनत आहेत तकलादू .
जेव्हापासून आईवडिलांच्या मृत्युपत्रात
मुलीलाही मिळू लागला वाटा
तेव्हापासून माहेरी भाऊ-वहिनीच्या प्रेमाच्या
राहून गेल्या कथा .
वाव सर जी बहुत बहुत धन्यवाद