सुश्री शीला पतकी

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ “सैराट…” ☆  सुश्री शीला पतकी 

सैराट मधल्या झाडाला कशाला कधी वाटेल

वठलेल्या त्याला सुद्धा आतून पालवी फुटेल

*

एकेकाळी केवढा विस्तार, केवढा त्याचा बहर 

पक्षांची घरटे आणि चिव चिवचिवाटाचा कहर

*

येते जाते वाटसरू विसावायचे पायथ्याशी

ऐसपैस झोपायचे बुंधा घेऊन उशाशी

*

चरती जनावरं त्यांना सावलीचा निवारा 

मेंढपाळाचं पोर मांडी मेंढराचा पसारा

*

हळूहळू वठलं झाड पानफुल गळालं

उरलं लाकूड वेडंवाकडं म्हणती झाड जळालं

*

एके दिवशी आर्ची संग परशा चढून बसला

प्रेम गोष्टी ऐकून त्यांच्या वठला वृक्ष हसला 

*

सतत असते गर्दी आता झाडाच्या भोवती 

कोणी चढती कोणी बसती सेल्फी आता घेती

*
वठलेल्या झाडालाही आता आलाय भाव 

नागराज मुळे झालंय आता झाडाचे ही नाव

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments