श्री अ. ल. देशपांडे
☆ मैत्र जीवांचे… ☆ श्री अ. ल. देशपांडे ☆
अडीअडचणीच्या काळी परस्परांना निरपेक्ष मनाने सांभाळून घेणे म्हणजे मैत्री.
एकमेकांचे गुणदोष निर्भय मनाने तसेच हक्काने आवर्जून लक्षात आणून देणे म्हणजे मैत्री.
गरीब श्रीमंत हा भेदभाव स्वप्नातही न येऊ देणारी भावना म्हणजे मैत्री.
प्रसंगी कुणाच्या उपयोगी पडलो तर संबंधितांच्या कौटुंबिक जीवनात डोकावण्याचा आपल्याला हक्क प्राप्त झाला आहे असं चुकूनही मनात येऊ न देणे म्हणजे मैत्री.
अनौपचारिक प्रतिबद्धतेने सदैव एकमेकांचे हितचिंतक असणें म्हणजे मैत्री.
© श्री अ. ल. देशपांडे
अमरावती
मो. 92257 05884
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






