श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ आम्ही जातो आमच्या गावा… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

निघालो घेऊन

उर्जेची गाठोडी

साधनेस उपयोगी

निशीदिनी…

*

शब्दात ओवणे

कठीण कठीण

अनुभवाल तेव्हाच

येता तपोवनी…

*

धागा एक एक

पाश एक एक

तुटून, सुटून

व्हाल आबादानी…

*

साधन आणि सेवा

एकाच नाण्याच्या

बाजू दोन

व्हाल अष्टावधानी..

*

प्रपंच हवा नेटका

तोचि परमार्थ साधका

आहे हे अभेद्य

जाण त्वा जगामाजी..

*

आले डोळा पाणी

जड झाले पाऊले

शरीराने जरी माघारी

मन मात्र अजूनही तपोवनी..

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments