मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ गुलबक्षी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? गुलबक्षी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

तिन्ही सांजेला दिसते झाडा झाडावर नक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

*
वेळ अजबच हिची श्रावणात बहरते

भादव्यात गणेशाच्या अंगावर लहरत

चंद्रकंठ म्हणतात चंद्रप्रकाश हा रक्षी

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

*

देशामध्ये विदेशात आहे खूप हिची ख्याती

संध्या मालती होऊन नित्य बहरत जाती

कधी गुलाबी पांढरी वेधतसे जणू लक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी 

 *

कोणी जांभळी चमेली, बहुरंगी निशाचर

कुठे असरुमा नामे कुठे सूर्यास्त सुंदर

मधु कण हिच्यावर गोळा करी मधुमक्षी

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी

 *

कुठे रात्रीची ही राणी आणि गोधुली गोपाल

हिच्या संगतीत रमे सानथोर किती काल

शांत निशांत वेळेला सूर्य चंद्र हिच्या कक्षी 

येते स्वागताला पहा उमलून गुलबक्षी 

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सोनचाफा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “सोनचाफा…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

तेजस्वी रुप पाहता

मन मोहरुन गेले 

अंतरीच्या वेदनांचे

सुगंधी फूल झाले.

*

मकरंद गोड हृदयी

मज मोह आवरेना

देखणे इतके फूल

मज तोल सावरेना

*
भाव गंध दरवळ 

मज ध्यास सोडवेना

हळूच स्वल्प न्याहळे

परी दूर लोटवेना

*

सद् विचार मानवी

अवीट या चाफ्यापरी 

अलगद स्पर्श होता

सुगंध ओंजळभरी 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ब्रम्हानंदी ऐसी लागली टाळी ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ब्रम्हानंदी ऐसी लागली टाळी  ? श्री आशिष  बिवलकर ☆

वेड लावलेस पांडुरंगा,

चरचरात तूच दिसावा |

पंढरीच्या वाटेवर ऐसा,

सुखे निद्रा गोड विसावा |

*
आकाश घेतले पांघरूण,

अंथरुण झाली धरणी |

शेजारी बैसली वृंदा,

हरी सुखाची पेरणी |

*

गात्र जरी थकली आता,

ओढ तुझी पायांत आणते बळ |

झरझर पाऊले पडतात,

चाखाया हरी दर्शनाचे फळ |

*

अठ्ठावीस युगं तू उभा,

पुंडलिकाच्या त्या विटेवर |

संसार जगाचा हाकतोस,

दोन्ही हात ठेऊन कटेवर |

*

वैष्णवांचा सोहळा रंगे,

चंद्रभागेच्या वाळवंटी |

तहान भूक विसरून,

लेकरं माऊलीच्या भेटी |

*

चालून चालून पडल्याजागी 

ब्रम्हानंदी ऐसी लागली टाळी |

अशा वेड्या भक्तांची पायधूळ,

सखा पांडुरंग लावतो कपाळी |

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ सृजन सृष्टीचे… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? सृजन सृष्टीचे ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

सृष्टीचे सृजन हिरवे

ह्रदय पानातून उगवे

त्या सृजन काळजातून

शुभ्र फुलांचे हे ताटवे

*
गंध तयाचा मंद असावा

तयास वाहून नेई हवा

भाग्य जयाचे तया मिळे

सुगंध याचा नवा नवा

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चित्र एकच.. विचार दोन… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चित्र एकच.. विचार दोन… ?  सुश्री वर्षा बालगोपाल 

[ एक – झाड बोलाया लागले.. ]

शिशिर आला, पानगळ झाली 

तरी महत्व आले पानाला 

पुत्र मरे बापा आधी जाणून 

सांगा काय वाटत असेल झाडाला?

*
पिकले पान झाले, गळणारंच कधीतरी 

हीच शिकवण मानवाला द्यावी 

असेल का पानाच्या हृदयांतरी?

*

गळून पडले पान 

पण शाबूत औषधी गुण 

म्हणूनच गोळा करती पान न पान 

तेलरूपे ठेवती बाटल्या भरून ||

*

तसेच जगावे हे माणसा

घे तू छोट्या कृतीतून जाणून

मरावे परी कार्यरूपे उरावे

आदर्श द्यावा आठवांमधून ||

*

झाड परी सांगे जीव तोडून

जाऊ नका संकटांना घाबरून

जाणार हे पण क्षण निघोन

येणार सुख जीवनी वसंत होऊन ||

[ दोन – बागेतला बाक]

बागे मधला बाक एकला 

काय सांगतो जरा ऐक 

विसावली किती पिकली पाने 

गळून गेली करीत एक एक ||

*
झाडावरुनी मग गळली पाने

आठव सांगत विसावली थोडी

हळवी झाली मग ती ही वेडी

सांत्वन बाकाचे करीत धागे जोडी||

*

पिकल्या पानांच्या बाकावरुनी

चाललेल्या अनेक गप्पा

मागचे झाड ऐकत होते सारे

साक्षी ठेवत हृदय कप्पा||

*

गेली कित्येक पाने सोडून

बाक एकला रडू लागला

पान रूपी शब्द झाडाचे

आले धावून सांत्वनाला||

*
संगतीला कोणी नाही 

म्हणून उदास का व्हायचे?

कोणत्या रूपे देव येऊन

साथ देईल हेच आशेने बघायचे||

*

हसला बाक हळूच गाली

दुसरी पाने येतील कोणी

देव साथीला आहे विश्वास ठेऊनी

पानांना कुरवाळे सद्गतीत होऊनी||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आधुनिक मूलभूत गरजा… – चित्र एक काव्ये दोन ☆ श्री आशीष बिवलकर आणि सुश्री नीलांबरी शिर्के ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? आधुनिक मूलभूत गरजा… – चित्र एक काव्ये दोन ? सुश्री नीलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर 

( १ ) 

श्री आशिष बिवलकर

आधुनिक मूलभूत गरजा 

जेथे जेथे पूर्णपणे भागतात |

तेथे तेथे सर्व भाग्यवंतांचे,

हल्ली पाय सहज वळतात |

*

चंगळवादाच्या आजच्या दुनियेत,

तोंड गोड आणि कडू इथेच होते |

बाहेर जे कोणाला दिसू नये,

तोंड काळं इथेच झाकता येते |

*
आनंद झाला कधी,

खायला मिठाई खालीच मिळते |

गम में रम साठी,

मदिरा-बारमध्ये सहजच फळते |

*

कमी बजेट वाल्यांसाठी,

देशी दारूचे बाजूलाच दुकान |

स्वदेशीचा नारा देणाऱ्यांना,

यथार्थ मिळतो तेथे सन्मान |

*
अगदीच जास्त होऊन

कधी झाला टांगा पलटी |

तुमच्या सेवेत तत्पर आहे,

बाजूलाच मल्टी स्पेशालिटी |

*
जसा ग्राहक, तशी सेवा,

एकाच ठिकाणी जिथे मिळते |

‘ऑल इन वन’च्या जमान्याचं,

व्यावसायिक गणित त्यांना कळते |

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

☆ ☆ ☆ ☆

( २ )

सुश्री नीलांबरी शिर्के

विदेशी प्यायला वरती बार

झुलत व्हायला देशी धार

आरामात राहायला लाॅज

रोग्यांसाठी हाॅस्पिटल वर

*

राजपुरोहित प्रसिद्ध मिठाई

शिक्षण अकॅडमी नाव साई

चांगल्या वाईटाचा असा संगम

आणखी कुठे पाहीला नाही

*

जुनी इमारत सांभाळते सारं

एकमेकात कुणाचं नाही वैर

कुठे जायचं निवड करून

मगच उचला आपला पाय

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तुळस मंजिरी… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तुळस मंजिरी ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

तुळशीची मंजिरी फुलं

एका घोसात शेकड्याने

मध गोळा करण्यासाठी

मधमाशा त्याच आकड्याने

*
मध घेऊन जाताना मंजिऱ्या

इथे तिथे आपसुक पडती

आपोआप जागोजागी

तुळस रोपं उगवून येती

*

जात नाहीत त्या पंढरीला

देतात तुळस रुजवून

वैजयंतीमाळ होऊन ती

विठ्ठला गळा बसे सजून

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अशी दिसे कळलावी… ☆ सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अशी दिसे कळलावी… ? सौ.रेणुका धनंजय मार्डीकर ☆

उत्सवाचा हा श्रावण 

निसर्गात ज्योत लावी 

समईतल्या त्या ज्योती 

अशी दिसे कळलावी 

*
 घाटमाथ्यावर पहा 

 हिचे देखणेसे रूप

 पंचारती ओवाळते 

 वल्लरीही सुस्वरूप 

*

 अग्निमुखी म्हणतात

 अग्निशिखा, कलहारी 

 खड्यानाग, बचनाग

 नावे हिची किती सारी

*

 आधी हिरवी, पिवळी

 नारंगी नी, लाले लाल

 फुले दिसती साजरी 

 जणू तेजाळे मशाल

*

 गौरी गणपतीसाठी 

 हात गौरीचे म्हणती 

 बहु गुणकारी आहे 

 झाली औषधी गणती

*

 नामशेष होत आहे 

 बहुगुणी कळलावी 

 करू तिचे संवर्धन 

 आणि काळजीही घ्यावी 

*

 सातपुड्याच्या घाटात 

 होते मी पाहिले हिला 

 आज शब्दातून माझ्या 

 काव्य बहारही दिला 

© सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मा हो ल! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ मा हो ल! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

भिंती माती लिंपलेल्या

चंद्रमौळी घराचा आधार 

पडे छपरातून कवडसा 

उजळण्या स्वयंपाकघर

*
चाले लगबग चुलीसमोर 

घरातल्या कर्त्या बाईची 

न्याहारी करण्याच्या नादात 

पर्वा ना चुलीच्या धगीची

*

गडबड तिची कामाची 

बारीक सारीक टिपली

जलद होण्या हालचाल 

बघा उकिडवी बसली

*

माहोल घरचा सकाळचा

छान टिपला कॅमेऱ्यात

करून कविता त्यावर 

दाद द्यावी आले मनांत

दाद द्यावी आले मनांत

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ पाहुणा ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? पाहुणा ? श्री आशिष  बिवलकर ☆

कुणी ना देखिला जगी,

श्वास कसा दिसतो |

चेतना असते जोवरी,

देहात तो वसतो |

*

शरीर एक नश्वर झोपडी,

श्वास राही त्यात पाहुणा |

पाहुणा जाता सोडून,

झोपडी निरर्थक म्हणा |

*

चोचले देहाचे चाले,

जोवर चालतो श्वास |

कोंडाता श्वास मात्र,

काळ घेतो त्याचा घास |

*

संसार सुखाचा थाटता,

येते प्रापंचिक जबाबदारी |

अखेरच्या श्वासापर्यंत,

सुटत नाही दुनियादारी |

*

कोणी रंक असो वा की राव,

विकत मिळेना त्यास श्वास |

जितकी आयुष्याची दोरी,

तितकाच इहलोकीचा प्रवास |

*

किती वर्ष जगला यापेक्षा,

कसा जगला यास अर्थ |

चौऱ्याऐंशी लक्ष योनी,

अन्यथा भ्रमण ते व्यर्थ |

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares