श्री दिवाकर बुरसे
इंद्रधनुष्य
☆ ‘मधुमती सूक्तम्‘ — भावानुवाद ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
“मधुमती सूक्त” हे वैदिक साहित्यातील एक अत्यंत सुंदर आणि रहस्यमयी स्तुति है, ज्यात “मधु” अर्थात् मधुरता, आनंद आणि सौम्यतेचे गुणगान केले आहे. हे सूक्त ऋग्वेदातून घेतले आहे. विशेषतः ऋग्वेदाच्या नवम मंडलाशी (सोम मंडल) संबंधित आहे जिथे सोमरस आणि त्याच्या दिव्यतेचे वर्णन केले आहे.
आध्यात्मिक अर्थ
हे सूक्त “मधु” म्हणजे सकारात्मकता, शुभता आणि समरसतेची सर्वत्र कामना करते. ब्रह्मांडाच्या प्रत्येक अंगाने आमच्या जीवनात मधुरता आणि सौम्यता यावी. हे सूक्त मुख्यतः शांति, आनंद आणि संतुलनाची प्रार्थना आहे.
☆ मधुमती सूक्तम् ☆
(ऋग्वेद १/१०/६-९)
ॐ मधुवाता ऋतायत l। मधु क्षरन्तु सिन्धवः।
माध्वीर्नः सन्त्वोषधी। मधुनक्ततुतोषसि। मधुवत् पार्थिवं रजः। मधु द्यौरस्तुनः पिता। मधुमान्नोवनस्पतिः।
मधु माँ अस्तु सूर्यः। माध्वीर्गावो भवन्तु नः।।
ॐ शांति शांति शांतिः।
भावानुवाद
समीर मंद मंदसे असेच नित्य वाहु दे।
सलील या नद्यांतुनी असेच गोड वाहु दे।
अशाच औषधी अम्हा रस मधूर देउ दे।
निशा-प्रभातही अशाच सौख्यदायि राहु दे।
अम्हासवे असेच लोक नम्र गोड वागु दे।
नीर सिंचुनी जगा नभ असेच रक्षु दे।
वृक्षवल्लरीतुनी रस मधूर वाहु दे।
नभातला रवी अम्हास रोगमुक्त ठेउ दे।
गोधने अम्हा सदा मधुर दूध देउ दे।
सौख्यदायि हे असेच सकल विश्व होउ दे।
ॐ शांति शांति शांतिः।।
भावानुवाद : श्री दिवाकर बुरसे
पुणे
संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





