सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
सौ. ज्योती कुलकर्णी
💐 अ भि नं द न 💐
सिद्ध लेखिका समुहातर्फे आयोजित राज्यस्तरीय गझल लेखन स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ कवयित्री सौ. ज्योती कुळकर्णी यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.
ई-अभिव्यक्ती मराठी तर्फे सौ. कुळकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा 💐💐
पुरस्कार प्राप्त कविता ‘असे केले कधी नाही‘ आज प्रकाशित होत आहे. 🪻
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
कवितेचा उत्सव
☆ “असे केले कधी नाही” ☆ सौ. ज्योती कुलकर्णी ☆
(सिद्ध लेखिका समुहातर्फे आयोजित राज्यस्तरीय गझल लेखन स्पर्धेत – प्रथम पारितोषिक प्राप्त)
☆
कुणी मज नाव ठेवावे असे केले कधी नाही
जरी मी नाव काढावे असे केले कधी नाही
*
कसे देवास मी मागू? निरोगी ठेवले त्याने
नियंत्याने कमी द्यावे असे केले कधी नाही
*
जरी मी हारले असले तरी वृत्ती खिलाडू ना!
रडीचे डाव खेळावे असे केले कधी नाही
*
दिल्या जखमा मलाही तर जगाने बोचऱ्या काही
जगाने बोल लावावे असे केले कधी नाही
*
कुठे मी आपल्या केली भलाई वागण्याची का?
कुणी वाईट वागावे असे केले कधी नाही
☆
© सौ. ज्योती कुलकर्णी
अकोला.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








धन्यवाद सर!🙏🙏
हार्दिक अभिनंदन, ताई.