कविराज विजय यशवंत सातपुते

 

(आज प्रस्तुत है कविराज विजय यशवंत सातपुते जी  की स्व. अण्णा भाऊ साठे जी  के स्मृति दिवस पर एक रचना।स्व  अण्णा भाऊ साठे जी को सादर नमन )

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आज स्मृती दिन. त्या निमित्ताने ही रचना लोकार्पण. . . . !   – विजय यशवंत सातपुते, पुणे

 

☆ अण्णा माझा. . . ! ☆

भाऊराव वालुबाई
पोटी जन्मे तुकाराम.
जाईबाई नी शंकर
भावंडांचे निजधाम.

वाटेगावी जन्मलेला
साहित्यिक तुका थोर
कथा, काव्य, पोवाड्यांचा
अभिजात  आहे जोर. . . !

लोककला,  वगनाट्ये
गवळण ,  बतावणी
गण,  वग ,  प्रबोधन
केली समाज बांधणी. . . . !

वर्ग विग्रहाचे ज्ञान
समाजात रूजविले
लाल बावटा संस्थेने
क्रांतीसूर्य घडविले. . . !

पोटासाठी तुकाराम
जागोजागी करी काम
आयुष्याचे केले रान
नाही घेतला आराम. . . !

अण्णा नावे प्रिय झाला
रूढ झाला कथाकार.
दीन दलितांची दुःखे
त्यांचा झाला भाष्यकार. . . !

एकवीस कथाग्रंथ
कादंबरी एकतीस
कम्युनिस्ट विचाराने
प्रबोधन साधलेस.. . . . !

वगनाट्ये तेरा चौदा
अजूनही काळजात
विघातकी रूढींवर
केली लेखणीने  मात. . . !

महाराष्ट्र चळवळ
गोवा मुक्तीचा संग्राम
वार्ताहर, कथाकार
विचारात राही ठाम. . . . . !

रशियन , फ्रेंच आणि
इंग्रजीत भाषांतर
शोषितांचे अंतरंग
भावनांचे वेषांतर. . . . !

रंगभूमी कलावंत
‘इप्टा’ चाही कार्यभार
स्वीकारला कर्तृत्वाने
जग भरात संचार.. . . . !

भुका आहे देश माझा
त्याची भाकरी होईन
शब्दा शब्दातून त्याला
नवे जीवन देईन. . . . !

हीच जाणिव ठेवून
अण्णा माझा  साकारला
स्मृतीदिन आज त्याचा
आठवात आकारला. . . . . !

 

✒  © विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकारनगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798.

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments