सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ काठी☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

(अनलज्वाला)

आधाराला दिली तुला मी माझी काठी

नकोस समजू सदासर्वदा कुबडी साठी

*

तुटतील कशी रक्ताची ही पक्की नाती

मारून पहा पाण्यावरती मोठी काठी

*

काय चांगले केले आहे सांग जगाला

पान उलटता शोभेसाठी नसते ‘साठी’

*

नाते जुळले स्वर्गात कुठे माहित नाही

इथे बांध ना प्रेमाच्या तू रेशम गाठी

*

धाव धावतो पैसा मिळतो कसली घाई?

वाघ लागला आहे का रे तुझिया पाठी?

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments