श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 295
☆ कवितेचं घर… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
ती मला भेटली तेव्हा
अगदी अल्लड
मुक्त छंदासारखी होती
तोंड ओळख झाली
ती थोडी सावरली
आणि
छंदात वावरू लागली
माझीही छाती
अभिमानाने भरून आली
आज ती
माप ओलांडून
घरात आली
आणि
तिच्या वागण्यात
छान लयबद्धता
दिसू लागली
कवितेच्या भाषेत सांगायचं झालं
तर वृत्तबंद्ध कविता…
आज ती
एक पाऊल
अजून पुढं गेली
चक्क वृत्तबंद्ध
गजलेच्या रुपात
समोर आली
हळू हळू त्या गजलेत
ठासून गजलीयत
भरू लागली
आज माझं घर
संपन्न झालं
कवितेचं घर झालं…
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




अरे वाह! मस्तच प्रवास गझलेत पर्यंतचा