श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 296 ?

☆ सांगतेचा सोहळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

कौतुकाची केवढी बरसात आहे

सांगतेचा सोहळा दारात आहे

 *

माणसांचाही इथे  करतात कचरा

काम होता टाकती केरात आहे

 *

सोडले मी नाव बापाचे नि घरही

अन् तरी संस्कार त्या नावात आहे

 *

या घराला रूप आलेले नवे हे

टाकलेला प्राण तू देहात आहे

 *

जीव आतुर शब्द आई ऐकण्याला

आणला मी प्राण हा कानात आहे

 *

नोकरीची लालसा घेऊन गेली

आज आला तो पुन्हा गावात आहे

 *

लादलेले युद्ध आहे माणसांनी

त्यामुळे माणूसपण धोक्यात आहे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments