श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०३
☆ मृत हिरवळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
ओल्या अंगाने
ती युवती
नदी बाहेर आली
तिची नाजूक पावले
पाणी निथळत
पाऊल वाटेने निघाली
दुसऱ्या दिवशी मीही
कोरड्या पावलांनी
त्याच वाटेने निघालो
तर ती पाऊलवाट
हिरवळीत परिवर्तीत झालेली
श्रीरामाच्या पदस्पर्शाने
जशी दगडातून
अहल्या प्रगट झाली
तशीच
ही मृत हिरवळ
त्या युवतीच्या पदस्पर्शाने
उगवून आलेली दिसते…!
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





