श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०४
☆ पावसा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
पावसा आता तुला कंटाळले
जा म्हणूनी हात आहे जोडले
*
काल मी आतूर होते भेटण्या
भेट पहिली छान होते नाचले
*
भंग केला तू कराराचा असा
वागणे आहे तुझे हे टोचले
*
मित्र होता आज झाला शत्रु तू
तू तुडवता शेत माझे लोळले
*
एवढ्या वर्षात नाही जाहला
वेधशाळा देत आहे दाखले
*
सांगना तू काय आता खायचे
तू बरसला पीक सारे नासले
*
गाळ हा शेतात होता साचला
वाटले मी विस्तवातुन चालले
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





