श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३११
☆ जाम लावा भाकरीला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
सात जन्माचे बंधन आता पाळतोय कोण
घटस्फोट हे घेण्याचे किती वाढलेय लोण
*
सात फेऱ्यांचाही तिने नाही पाळला करार
सोने नाणे घेऊन ही वधू झालेली फरार
*
लग्नापूर्वीचे शूटिंग खर्च केला हा लाखात
लग्नानंतर हो नाही कुणी कुणाच्या धाकात
*
भरपूर वेळ आहे नाही दळण कांडण
कुत्र्या मांजरा सारखे होते घरात भांडण
*
सम वाटणी कामाची दोघे आहे नोकरीला
भाजी नाही केली सांगे जाम लावा भाकरीला
*
माय कामावर गेली पोर घरी रडवेला
दूध आया ही पाजते माझ्या छोट्या लेकराला
*
आहे आबादी आबाद चकाकतोय बंगला
नाही संस्कार राहिले आहे माणूस खंगला
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





