श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३१५
☆ कार्यशाळा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
वेदनेने कार्यशाळा घेतली
अन् तरीही खूप होती गाजली
खोल जखमांचीच जागा ही तरी
दुर्बलांनी चाळ तेथे बांधली
जाहलेले तेजही नाही कमी
कुंदनाने खूप ज्वाळा सोसली
खंजिराचा दोष नव्हता फारसा
रक्तरंजित योजना तू आखली
वस्त्र नव्हते अंगभर त्यांच्याकडे
जीर्ण कपडा लाज त्याने झाकली
पेटला शेजार आहे अन् तरी
झोप आम्हाला कशी ही लागली
केस साधा कापतो आहे गळा
क्रूरतेने आज सीमा गाठली
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




