कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २७९ – विजय साहित्य
☆ मौलिक प्रवास…! ☆
☆
मित्रासवे दुचाकीने
बालपणी दिली साथ
जवळच्या प्रवासात
“सायकल” दावी वाट…! १
*
वाट वाकडी तिकडी
कींवा डोंगराचा घाट
कच्च्या पक्क्या रस्त्यातून
“सायकल” काढी वाट…! २
*
कधी मागे, कधी पुढे
बैसवोनी सवंगडी
वाण सामान वहाया
“सायकल” हरघडी…! ३
*
हवा भरताच धावे
प्रवासात भरे रंग
“सायकल” सफरीचा
मनमौजी असे ढंग…! ४
*
हातामध्ये असे ब्रेक
नियंत्रित हिची धाव
क्षण भर विश्रांतीचे
गाठी मुक्कामाचा गाव…! ५
*
नित्य घडतो व्यायाम
वेळ वाचवीते खास
नाही खास देखभाल
करी मौलिक प्रवास..! ६
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





छान कविता!आज सायकल दिन आहे का?