श्री शरद कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ द्वैत… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆
☆
आल भरुन आकाश
फक्त तुझ्यासाठी .
मी होईन पाऊस
फक्त तुझ्यासाठी .
मयूर मी नृत्यातुर
फक्त तुझ्यासाठी .
वारा होईन बेभान
फक्त तुझ्यासाठी .
वृक्ष होउन भिजेन
फक्त तुझ्यासाठी .
पक्षी होउन गायीन
फक्त तुझ्यासाठी .
मी झुूरेन मरेन
फक्त तुझ्यासाठी .
जन्मोजन्मी जन्म माझा
फक्त तुझ्यासाठी .
तुझ्या विना जगणे
सांग कशासाठी ?
द्वैत एवढेच आता
फक्त माझ्यासाठी .
☆
© श्री शरद कुलकर्णी
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




