कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # २८६ – विजय साहित्य
☆ गंध पिसारा…! ☆
☆
चला वेचूया, अंगणातल्या
शुभ्र केशरी, गंध चांदण्या.
*
नाजूक पुष्पें, जरा वेचना
ओंजळीतले, शब्द ऐकना
*
साथ क्षणांची, फुले सुगंधी
स्पर्श तयाचा, करी आनंदी.
*
उमलताना , ठेऊन जाते
आठवणींच्या, कुपीत नाते.
*
आजी वाहते, लक्ष फुलांचा
जाई वेचण्या, थवा फुलांचा.
*
फूल प्राजक्ती,मनात राही
गंध मनी या, मावत नाही.
*
वहात येता, पहाट वारा
फुले अंगणी, गंध पिसारा.
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




