श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२१
☆ गुणगान माझे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
(चाल : पुकारता चला हूँ)
☆
विचारणा करायची
माझ्यावरी मरायची
खुशालचेंडू मी असा
उगाच ती झुरायची
*
विचारणा करायची
माझ्यावरी मरायची
खुशालचेंडू मी असा
उगाच ती झुरायची
विचारणा करायची
*
मैत्रिणीच्या सोबती असायची
उठून त्यांत तीच तर दिसायची
मैत्रिणीकडे तिच्या मी पाहता
व्यर्थ का ती दात ओठ खायची
विचारणा करायची
माझ्यावरी मरायची
खुशालचेंडू मी असा
उगाच ती झुरायची
विचारणा करायची
*
मीही चोरुनी तिला पाहातसे
अनंत काळजावरी तिचे ठसे
गप्प ती तरीही कान ऐकती
अखंड गुणगान माझे गायची
विचारणा करायची
माझ्यावरी मरायची
खुशालचेंडू मी असा
उगाच ती झुरायची
विचारणा करायची
माझ्यावरी मरायची
☆
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





