कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # २९२ – विजय साहित्य ?

☆ पुस्तक वारी…!

द्विपदी – वंशमणि : २० मात्रा [८+८+४] [ | प | प | – + |]

पुस्तक आहे, आयुष्याची, वारी

वाचत जाता, ठरते ‌संकट‌‌ हारी.

 *

गुरू जनांचा, जया लाभला वारा

शब्द शारदा, करात देई थारा.

 *

वाच एकदा, पान बोलके, त्याचे

वाचे बरवे, कवित्व हृदयी, साचे

 *

पुस्तक नाही, भातुकलीची जागा

जिथे अक्षरे, करती उगाच त्रागा.

 *

मित्र असावा, पुस्तक वेडा, प्राणी

खिशात त्याच्या, साहित्याच्या खाणी.

 *

सांगत जाई, धोके पुढचे‌, जेव्हा

ज्ञान शलाका, देई दर्शन तेव्हा

 *

मम माऊली, ज्ञान संपदा, छाया

गुरु प्रमाणे, तिची लाभते ‌माया.

 *

तीन खणाची, पुस्तक वारी, मोठी

बाल प्रौढ नी, जराच वसने छोटी

 *

शब्द शारदा, जिच्या रुपाने, खुलते

हरी पाठ वा, ग्रंथ कोंदणी, फुलते.

 *

जीवन पानी, वाट यशाची, धरते

तीच सावली, अक्षय माया, करते.

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments