श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

भावसमुद्र... ☆ श्रीशैल चौगुले ☆

ओठाच्या किनारी विरघळून गेले सोबती

डोळ्याच्या नभातले ओघळलेले मोती.

मनाच्या घनांत आठवणींचे वादळ

कधी वचनांच्या विजांचे भय भोवती.

 *

सजवून जीवनास विश्वासाचा ऋतू

धोकाच झाला हृदयसृष्टीचे हयाती.

 *

अखेर शब्दांची समजूत एक सत्य

काव्यानी निभावले वैफल्याच्या त्या राती.

 *

लाटा क्षणांच्या पार करती सल कुठे

काठावरचे स्वर सुखावे व्यथा गाती.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted