श्री तुकाराम दादा पाटील
काव्यानंद
☆ तुका म्हणे – आहा हे कौतुक… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆ तुका म्हणे ☆
☆
तुका जगा द्यावी नीती /
करावे फजित चुकती ते //१//
*
कासयाचा बाध एकाच्या निरोपें
काय व्हावें कोपें जगाचिया //२//
*
अविध्येचा येथें कोठें परिश्रम/
रामकृष्णनाम ऐसें बाण //३//
*
तुका म्हणे तेथें ख-याचा विकरा /
न सरती येरा खोट्या परी //४//
*
– संत तुकाराम.
तुका म्हणे
जो चुकतो त्याची पुरती फजिती करावी आणि साध्या सामान्य लोकांना खरी नितीमत्ता शिकवावी हेच आमचे कौतुकाचे नव्हे तर मुख्य काम आहे. तो अधिकार आम्हाला मिळाला आहे. आम्ही असे वर्तन केल्याने सगळे जग जरी आमच्यावर रागावले तरी आम्हाला काहीच फरक पडणार नाही. कारण आम्ही कुठल्याही अविध्येचा प्रचार प्रसार मुळीच करत नाही आणि तो खोटारडेपणा मिळवण्यासाठी नको ते आडवळनाचे कष्ट ही करत नाही. त्याला विरोध करण्यासाठी आमच्या हातात रामकृष्णनामाचे प्रभावी शस्त्र आम्ही धारण केले आहे. या जगात फक्त ख-याचीच प्रामुख्याने विक्री होते हे आमच्या पुरते लक्षातही आले आहे. खोटारडा हिंनसक, येरागबाळा माल येथे खपत नाही हेही आता आम्ही जाणून आहोत.
आपण जे करतो आहे त्याच्यावर तुकाराम महाराजाची दृढ श्रध्दा आणि अतूट विश्वास आहे. त्यालाच ते सत्याचा खरा मार्ग आहे असे मानतात. आणि म्हणूनच जगातील सामान्य भोळ्याभाबड्या लोकांना नैतिकतेचा बोध देणे आणि ती त्यांना शिकवणे व तिच्यापासून जर कोणी दूर जात असतील तर त्यांना जाग्यावर आणने हेच आपले महत्त्वाचे काम आहेअसे महाराजमानतात. तेच मी आवडीने करत आहे. असे म्हणतात. जग मला काय म्हणेल, कोणाला काय वाटेल कोणाला राग येईल. याच्याशी माझे काहीही देणेघेणे नाही. त्या मुळे मी करत असलेल्या कामात कसलीही बाधा येणार नाही. महाराजांचा हा दृढनिश्चय आहे. कारण ते म्हणातात आम्ही चांगले म्हणजे देवानेच काम करीत आहेत. आणि आमच्या कामात अडथळा आणणाऱ्याच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही आता रामकृष्ण हरी नामाचे अत्यंत प्रभावी शस्त्र ही हाती धारण केले आहे. म्हणून आम्ही आमचे कार्य चालूच ठेवणार आहोत. तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना स्वानुभवातून दिलेला हा संदेश प्रभावी आणि परिणामकारक वाटतो. व ते सर्व त्याचा विनंम्रभावे स्विकारावी करतात. व तेथेच नतमस्तक होऊन आपली अतूट श्रद्धा ही ठेवतात. हेच तर तुकाराम महाराजांच्या लोकमान्य तेचे खरे गमक आहे. ह्मणूच तुका झालासे कळस असे लोकांना वाटत रहाते.
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈







