श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – होय होय वारकरी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

होय होय वारकरी /

पाहे पाहे रे पंढरी //१//

*

काय करावी साधने/

फळ अवघेंचि येणें

*

अभिमान नुरे/

कोड अवघेचि पुरे //३//

*

तुका म्हणे डोळा /

विठो बैसला सावळा//४//

*

– संत तुकाराम.

तुका म्हणे

तुकाराम महाराजांची साधी सोपी सरळ पण रसाळ भाषा भक्ती मार्गातल्या अडाणी माणसाला सहजतेने उमगते व महाराजाना भक्ताला काय सांगायचे आहे ते नेमके पणाने ध्यानी येते.

भक्ती मार्ग किती सोपा आहे हे सांगताना ते म्हणतात. तुला जर भक्तीच करायची आहे तर तू पंढरीला जा आणि कयमचा वारकरी हो. जर तुला त्यातच समरसून भक्ती करण्याचे फळ मिळत असेल तर मग अन्य जप तप साधने या सारखे काही उपाय करण्याची गरजच नाही.

तू तेथे गेल्यावर तुझ्यातला अभिमानाचा ताठा आपोआपच गळून पडेल. तुझ्या मनाचे भक्ती रसाचे कोडकोतूक ही पूर्ण होईल. कारण तू एकदा का पांडुरंगाचे सावळे लोभस रूप पाहिलेस की ते तुझ्या डोळ्यात आणि काळजात कायमचे ठाण मांडून बसेल. आणि तिथला अनुपम्य सोहळा तू कधीच विसरू शकणार नाहीस.

परमेश्वराची भक्ती करण्यास भावना आणि श्रद्धा एकवटली पाहिजे. त्यासाठी तू एकदा पंढरीला जा. आणि खरोखरचा वारकरी बन. तिथे गेल्यावर तू तिथल्या आनंदमयी सोहळ्यात समरसून एकरूप झालास की तुझा अहंकार आणि स्वाभिमान आपोआप गळून पडेल. कारण तिथे कोणताही भेदभाव द्वैष, द्वैतभाव जातीपाती या सारखे काही ही उरत नाही. सगळे समसमन होवून एकामेकात पांडुरंग पहातात. गळा मिठी घेतात. परस्पर दर्शनाने पावन होतात. आपल्या मनातील भक्तीचे कोडकोतूक पूर्ण करून घेत पांडुरंग मय होवूनच वावरताना दिसतात. असा अनुपम्य सोहळा इतरत्र कोठे पहावयास मिळत नाही.

अशा वातावरणात सर्वांभूती संचारणारा सावळा विठूराया तुझ्या ही अंत:करतात कायमचा भरून राहिल. इतका साधा आणि सोपा भक्ती मार्ग सांगितल्यावर लोक भक्ती मार्ग अनुसरतील याचा विश्वास महाराजाना होता तो आज सार्थ आणि समर्थपणे चालत आलेल आपण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. हेच आहे समाजाकडून वारीचे शतकानुशतके चालत आलेले महत्त्व.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments