सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८५ ?

☆ नवरात्री पर्व… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

नवरात्र आलं की,

सासूबाईंची खूप लगबग सुरू होई,

नऊ दिवसाचा उपवास,

त्यासाठी आधीच वरई,

राजगिरा दळून आणायचा !

आदल्या दिवशीच देवाची भांडी,

लख्ख घासून काढायची!

अंबा,भवानी नऊ दिवस–

 मुक्कामाला येणार घरी !

याची तजवीज आधीच,

करून ठेवलेली असायची!

गोंधळी रोज यायचा,

संबळ वाजवायचा!

 देवीची आरती—

कापराचा वास,

झेंडूची फुलं—पिवळ्या

तीळफुलाच्या माळा!

 

आजही नवरात्र येतेच,

मी ही करते घटस्थापना!

जपते तीच परंपरिकता!

करते देवीचा जागर,

पण आता गोंधळी येत नाही !

मी ही करतेच भक्तिभावाने,

सारे काही,नैवेद्य, पूजा ,

आरती,कडकण्या!

 

पण  तो माहौल येत नाही,

माझी भक्ती सासूबाईंच्या भक्तिशी

मॅच होत नाही !!

© प्रभा सोनवणे

२३ सप्टेंबर २०२५

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ.ज्योती कुळकर्णी, अकोला.

छान!