सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३०१
☆ मी आणि माझं अंतर्मन… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
आयुष्य असतं एक उपवन,
जेव्हा करतो आपण,
स्वतःचं अवलोकन,
तेव्हा जाणवतं ,
स्वतःमधलं कमीपण!!
करावा व्यक्त होण्यासाठी
कुणाला फोन —
सारेच जण अनभिज्ञ,
तुमच्या सुख दुःखाशी,
कुणालाच नसतं घ्यायचं ऐकून,
फक्त ऐकवायचंच असतं !
खूप एकटं वाटतं आपल्याला,
पण नसतं कुठेच—
सहसंवेदन !!!
मग वाटायला लागतं,
आपलंच अंतर्मन,
एक स्वच्छ, बिलोरी दर्पण!
याहून काय वेगळं असतं,
जगण्यातलं जीवंतपण
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




