प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३०५
☆ गझल… आयुष्य ☆ प्रभा सोनवणे ☆
☆
हे पात्र नदीचे सुशांत.. अवखळ नाही
जगण्यात अता कुठलेही वादळ नाही
*
आयुष्य कधी थांबते का कुणासाठी ?
हृदयात जराही तसली खळबळ नाही
*
तू ठेव तिथे लपवून तुझी गाऱ्हाणी
सरकार म्हणे आम्हाला कळकळ नाही
*
बाईस विचारा काय पाहिजे आहे ?
गावात तिच्या मुक्तीची चळवळ नाही
*
की मूग गिळावे आणि मूकच रहावे ?
मी त्यांच्या इतकी मुळीच सोज्वळ नाही
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




