प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३१७
☆ गझल… ☆ प्रभा सोनवणे ☆
☆
मी मानले स्वतःला गंधाळता धुलीकण,
सारे समग्र जीवन केले तुलाच अर्पण
*
त्या पावसात जाता,वारा मुजोर झाला,
सारे ऋतू सुखाचे मी ठेवलेत तारण !
*
गेल्या बुजून तेव्हा साऱ्या वसंतवाटा,
मग शुष्क भावनांनी केली पुन्हा भलावण !
*
नाही,नको म्हणाले घेण्यास उंच झोका,
आकाश चांदण्याचे त्याने दिलेच आंदण !
*
आल्या फुलून बागा,वणवा विझून जाता,
आयुष्य सांजवेळी झाले कसे विलक्षण !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





