प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # ३२५
☆ ।। गझल ।। ☆ प्रभा सोनवणे ☆
☆
वागू नका असे की…उन्मत्त ते सवाली
आहे अजून भारत भरपूर भाग्यशाली
*
मारायला निघाले आहेत माय भू ला
सोडून लाज लज्जा करतात जे दलाली
*
प्रत्येकजण सुखाचा मागेल एक प्याला
एका कुणास येथे बघ लाभती पखाली
*
हे पाप कोणते अन पुण्यास कोण वाली
सारेच संत आता भोंदू, भुके, मवाली
*
राष्ट्रीय सण कधीही विसरू नका मुलांनो
देऊन प्राण गेले ते वीर…हो अकाली
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार
पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- sonawane.prabha@gmail.com
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈




