श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ श्रावणमासी खेद मानसी – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
☆
एक वास्तव
खूप छान विडंबन…….
*
श्रावणमासी खेद मानसी
हिरवळ गेली कुणीकडे?
शहरे भरली इमारतींनी
डांबर फरश्या चहुकडे।।
*
मनु बदलला अणु फोडला
निसर्गातही बदल घडे
श्रावणमासी तो मौजेचा
पाऊस आता कुठे पडे ? ।।
*
राने तुटली, कुरणे हटली
उजाड हे डोंगरमाथे
सुंदर हरणी हिरव्या कुरणी
कुठे कशी मग बागडते? ।।
*
सुवर्ण चंपक अजुनी फुलतो
रम्य केवडा दरवळतो
नगरनिवासीजन हौसेस्तव
बाजारी विकला जातो ।।
*
थकून भागून घरी परतती
ललना सायंसमयाला
हर्ष न उरतो ह्रदयी त्यांच्या
देवदर्शना निघण्याला ।।
*
प्रदुषणाने जीवन अवघे
होऊनी गेले संत्रस्त
कुठे कुणाच्या वदनी वाचू
श्रावण महिन्याचे हे गीत ।।
☆
कवी: अज्ञात
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






खूप छान आहे विडंबन कविता