वाचताना वेचलेले
☆ ‘ब्रह्मानंद…’ –– लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
ब्रह्मानंद म्हणजे शेवटी काय ?
१२ आनंदांची गोळाबेरीज.
०१. आई होण्यापेक्षाही… आजी होण्याचा
आनंद !
०२. नातवंडाच्या कृपेने अंगावरील कपडे ओले झाल्याचा
वत्सल आनंद!
०३. नातवंडानी केलेले हट्ट पुरविण्याचा
गोड आनंद !
०४. सुनेने, न मागता आणून दिलेल्या चहाचा व औषध घेतले का.. ?
या प्रेमळ चौकशीचा
सात्त्विक आनंद !
०५. वाढदिवसाला, मुलाने दिलेल्या शालीचा….
उबदार आनंद!
०६. आपण कुटुंबाला हवे आहोत……
या भावनेचा
सुप्त आनंद!
०७. दुपारी जेवणानंतर पेपर वाचता वाचता लागलेली डुलकी…
परमानंद !
०८. रात्रीची नीरव शांतता..
आराम खुर्चीवर डोळे मिटून
पहुडलेल्या क्षणी..
आपली आवडती गझल..
रेडिओने गुणगुणावी…
स्वर्गीय आनंद !
०९. एखादा लेख किंवा कविता
आपण पोस्ट करावी..
मित्रांनी त्याला भरभरुन
दाद द्यावी…
साहित्यानंद !
१०. मन अशांत असतांना….
देवघरातल्या भजनामुळे निर्माण होणारा..
कैवल्यानंद !
११. भेटलेल्या जुन्या सवंगड्यांच्या भेटीमुळे होणारा…
अपार आनंद!
१२. नकारात्मक विचार सोडून दिले की मिळणारा….
निर्भेळ आनंद !
आणि या सर्व आनंदाची बेरीज करुन, ती मनाच्या कप्प्यात साठविली की, पडल्यापडल्या लागलेली शांत झोप म्हणजेच…
ब्रह्मानंद !
या पोस्टला मिळालेली दाद म्हणजेच
आनंदीआनंद!
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈



