सौ. सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ चमचमीत तोंडीलावणी – कवयित्री: सौ. विद्या विष्णू वेलणकर ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

फोडशी भारंगी आणि तेरे अळू

आषाढात खाल्ले हळू हळू

*

केनी कुरडू शेवगा आणि टाकळा

श्रावणात खाऊन करू मोकळा

*

भेंडी पडवळ दोडका आणि गवार

भाद्रपद अश्विनात याचाच भडिमार

*

भोपळे महाराज कार्तिकात फोडू

वांगी आणि मुळा जोडीला काढू

 *

कडवे कुळीथ चवळीचे गावातच शेत.

मार्गशीर्षात उसळ कळणाचाच बेत

*

फणसाच्या कुयरीची भाजी

पौषातच खायची

दारातील तोंडली शेंगा हिरवी केळी

जोडीला काढायची

 *

माघ फाल्गुनाला काय

असं म्हणू नका

चिने कणगी कांदे सुरण.

दारातच आहे केळीचा कोका.

*

चण्याची उसळ आणि आंबा डाळ

याची मजा चैत्रात फार

वैशाखाची मजाच आगळी

उकडगरे आणि आमरस प्रत्येकवेळी

*

पावसाळ्याची बेगमी करून

उरलं सुरलं जेष्ठात संपवू

वर्षभर बाजारात गेलोच नाही

आमचं काही अडलं नाही

*

कोकणच्या गृहिणी आम्ही हुषार

टोमॅटोची दादागिरी

नाही चालू देणार नाही चालू देणार!

कवयित्री: सौ. विद्या विष्णु वेलणकर

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments